सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या धर्मध्वज पूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची उपस्थिती

0
9

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या धर्मध्वज पूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर धर्मध्वज पूजनाचा भव्य आणि मंगलमय सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. देशाच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन, सिंहस्थ धर्मध्वज पूजन आणि अर्घ्य अर्पण करण्यात आले. मंत्रोच्चारांच्या गजरात ध्वजस्तंभाचे पूजन झाल्यानंतर गोदावरी आरती संपन्न झाली आणि सिंहस्थ महापर्वाच्या धार्मिक सोहळ्याला मंगलमय प्रारंभ झाला.


या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडलेल्या या पवित्र विधींना उपस्थित राहून सुनेत्रा पवार यांनी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेशी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी आपले नाते अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.


यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी नदीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थाला सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री धर्मध्वज पूजन सोहळा संपन्न होणे, ही सिंहस्थ महापर्वाच्या तयारीतील महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.


सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मंगलमय सोहळ्याने सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या आध्यात्मिक पर्वाची सुरुवात अधिकच भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here