दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी श्री. देवेंद्र रामचंद्र शिर्के यांची बिनविरोध निवड

0
4

दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी श्री. देवेंद्र रामचंद्र शिर्के यांची 

बिनविरोध निवड.

आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्री. देवेंद्र रामचंद्र शिर्के यांची दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा               सौ. नुपूर आदेशकुमार शहा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली. 

बारामती सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक श्री. प्रमोद दुरगुडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. बँकेचे अध्यक्ष  ॲड. श्री. शिरीष कुलकर्णी, संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. देवेंद्र शिर्के यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी श्री. देवेंद्र रामचंद्र शिर्के यांनी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, बँकेचे अध्यक्ष                       ॲड. श्री. शिरीष कुलकर्णी, तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे तसेच सर्व सहकारी संचालक, संचालिका आणि व्यवस्थापन मंडळातील सदस्यांप्रती मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सहकार क्षेत्रातील विश्वासार्हतेचा ६५ वर्षांचा प्रवास दि बारामती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यांच्या बळावर उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास हा सहकारातील सामूहिक प्रयत्न, ठेवीदारांचा विश्वास, कर्जदारांचे सहकार्य आणि संचालक मंडळाच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. बँकेच्या विकासयात्रेतील प्रत्येक टप्प्यावर स्व. अजितदादा यांचे मार्गदर्शन, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्व दिपस्थंभ ठरले आहे. स्व. दादांच्या पश्यात आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी यांचे मिळणारे मार्गदर्शन बँकेसाठी मोलाचे आहे.      

आज बँकेच्या एकूण ठेवी सुमारे २,१६० कोटी, तर कर्जवाटप सुमारे रु. १,३७९ कोटी इतके असून, बँकेचे निव्वळ NPA प्रमाण ०% आहे. तर बँकेने सभासदांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लाभांश १०% दिला आहे.  बँकेने आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि रायगड या सहा जिल्ह्यांत बँकेच्या ३६ शाखा आणि १ विस्तारित कक्षाद्वारे ग्राहकांना बँकिंग सेवा दिल्या जात आहेत.               रु. २०,४०० पासून सुरू झालेला प्रवास रु. ५८.५९ कोटींच्या भागभांडवलापर्यंत बँकेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अवघ्या रु. २०,४०० च्या भागभांडवलावर सुरू झालेल्या बँकेने आज सुमारे रु. ५८.५९ कोटींचे भागभांडवल गाठले आहे. हा टप्पा म्हणजे बँकेवर सभासदांनी, ठेवीदारांनी आणि ग्राहकांनी दाखविलेल्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतीक आहे. 

बदलत्या बँकिंग व्यवस्थेत ग्राहकांना अधिक सुरक्षित, गतिमान आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देणे, व्यवसायवृद्धीला चालना देणे, आर्थिक शिस्त अधिक बळकट करणे आणि सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता जपणे, यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील आहे. सामूहिक नेतृत्वातून प्रगतीचा संकल्प नवनिर्वाचित उपाध्यक्ष  श्री. देवेंद्र शिर्के यांच्या निवडीमुळे बँकेच्या व्यवस्थापनाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्ग यांच्या समन्वयातून कामकाज अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रसंगी बँकेचे तज्ज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), संचालक श्री. सचिन सातव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. उद्धव गावडे, संचालक श्री. रोहित घनवट, श्री. किशोर मेहता,                   श्री. विजयराव गालिंदे, सौ. नुपूर शहा, श्री. नामदेवराव तुपे, श्री. जयंत किकले,  श्री. रणजित धुमाळ, श्री. मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ज्ञ संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य                  ॲड. रमेश गानबोटे, श्री. शांताराम भालेराव, डॉ. अमोल गोजे, श्री. ओंकार देवळे, कार्यकारी संचालक श्री. विनोद रावळ, मुख्य सरव्यवस्थापक श्री. सोमेश्वर पवार, सरव्यवस्थापक श्री. विजय जाधव, सहायक सरव्यवस्थापक                    श्री. प्रशांत शिर्के आणि मुख्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here