शालेय शिक्षणाबरोबर वारकरी सांप्रदायाचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे – निलेश महाराज

0
3

शालेय शिक्षणाबरोबर वारकरी सांप्रदायाचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे – निलेश महाराज
पाटण (सातारा) : आधुनिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कार, अध्यात्म आणि संतविचारांची जोड मिळणे काळाची गरज आहे. शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी सांप्रदायाचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, बालवयातच विद्यार्थ्यांना कीर्तन, भजन आणि संतवाङ्मयाची गोडी लागणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण मंडळ, सूर्यवंशीवाडी (म्हसोबाचा माळ), ता. पाटण, जि. सातारा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य मृदुंग अलंकार निलेश महाराज यांनी केले.
विद्यार्थ्यांनी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन उत्तम कीर्तनकार, भजनकार तसेच पखवाजवादक म्हणून घडावे आणि त्यांच्यामध्ये सांप्रदायिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे निलेश महाराज यांनी सांगितले.
श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेत शालेय शिक्षणासोबत वारकरी सांप्रदायाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. वर्षभराच्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांकडून हरिपाठ पाठ करून घेतला जातो. तसेच श्रीमद्भगवद्गीतेचा १५ वा अध्याय, ज्ञानेश्वरीतील ५० ओव्या पाठ करून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना काकडा, पखवाज वादन, वारकरी पाऊल तसेच ताल वाजविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून अखिल भारतीय पखवाज परीक्षा घेण्यात येतात. संतवाङ्मय, कीर्तन-भजन आणि वारकरी परंपरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, भक्तीभाव आणि सामाजिक जाणिवा रुजविण्याचे कार्य संस्थेतून सातत्याने केले जात आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संस्कारक्षम आणि मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व घडविणे आवश्यक आहे. वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संतांचे विचार, अध्यात्म आणि संस्कृतीची ओळख होते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला-मुलींना शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षणाचीही संधी द्यावी, असे आवाहन निलेश महाराज यांनी केले.
ज्या गरजू पालकांना आपल्या मुला-मुलींना श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण देण्याची इच्छा आहे, तसेच ज्यांना कीर्तनाचे शिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी निलेश महाराज : ९१३०२८९८७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले..!

Previous articleबारामती बाजार समितीत शेतमालाला दमदार भाव; ज्वारी ९,५००, उडीद १०,१०० तर बाजरी ३,६५१ रुपये
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here