सूर्यनगरीतील आठवडे बाजारावर निर्णय; गुरुवार-रविवारचा बाजार बंद करण्याचा नगरपालिकेचा ठराव स्थानिक नगरसेवक प्रविण माने यांचे निर्णयाचे स्वागत; नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा …!

0
5

सूर्यनगरीतील आठवडे बाजारावर निर्णय; गुरुवार-रविवारचा बाजार बंद करण्याचा नगरपालिकेचा ठराव
प्रविण माने यांचे निर्णयाचे स्वागत; नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा ऐरणीवर..!

प्रतिनिधी:-
सूर्यनगरी : गुरुवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडे बाजारामुळे सूर्यनगरी परिसरातील नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा, दुर्गंधी आणि अंतर्गत रस्ते बंद होण्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवार आणि रविवारचा आठवडे बाजार बंद करण्याचा ठराव नगरपालिकेने मंजूर केला असून, या निर्णयाचे नगरसेवक प्रविण दत्तात्रय माने यांनी मनापासून स्वागत आहे.
आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य रस्ता वाहनांनी व्यापला जातो, लेन नंबर ४ मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, तर सूर्यनगरीतील अंतर्गत सहा मीटरचे रस्तेही वाहनांनी अक्षरशः पॅक होतात, अशी परिस्थिती असल्याचे माने यांनी म्हटले आहे. मंडई परिसरातील वाढती गर्दी आणि त्यामुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास याचे ड्रोन शूटिंगही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नासंदर्भात स्थानिक नागरिकांचे लेखी अर्ज तसेच बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या सह्याही नगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरपालिकेने बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी नमूद केले.
‘एकदा सामान्य नागरिकाच्या घरासमोर उभे राहून परिस्थिती पाहा’
बाजार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधताना माने यांनी म्हटले की, काही जण जवळच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी किंवा वैयक्तिक संबंधांमुळे बाजार सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर त्यांनी गुरुवार आणि रविवारच्या दिवशी सूर्यनगरी लेन नंबर ४ मध्ये सामान्य नागरिकाच्या घरासमोर उभे राहून प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी.
“ज्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी वाद घालावा लागतो, ज्यांचे अंतर्गत रस्ते वाहनांनी बंद होतात, ज्यांना पार्किंगची समस्या भेडसावते, ज्यांच्या घरासमोर कचरा साचतो आणि दुर्गंधी निर्माण होते, त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘व्यापाऱ्यांचा व्यवसायही महत्त्वाचा, नागरिकांचे जीवनही’
माने यांनी स्पष्ट केले की, व्यापाऱ्यांचा व्यवसाय महत्त्वाचा आहेच; मात्र नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी संपूर्ण सूर्यनगरीतील नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
“बाजाराला विरोध नाही; मात्र योग्य जागी, योग्य नियोजनाने आणि सर्वांच्या हिताचा विचार करून बाजारव्यवस्था असावी, हीच आमची भूमिका आहे,” असे माने यांनी स्पष्ट केले.
‘नागरिकांचा प्रश्न मांडणे ही जबाबदारी’
सूर्यनगरीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न मांडणे हा नगरसेवक म्हणून आपला अधिकारच नव्हे तर जबाबदारी असल्याचेही माने यांनी सांगितले.
“कोणाच्याही वैयक्तिक विरोधाला किंवा दबावाला न जुमानता सूर्यनगरीतील नागरिकांच्या हिताचे प्रश्न यापुढेही ठामपणे मांडत राहणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सूर्यनगरीतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय घेतल्याबद्दल नगरपालिकेचे नगरसेवक प्रविण दत्तात्रय माने यांनी मनःपूर्वक आभार मानले असेही त्यांनी’ भावनगरी “शी बोलताना सांगितले

Previous articleबारामतीतील बाजार बंद करण्यामागचा उद्देश बारामती नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट करावा…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here