महिला दिन :कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो…

0
258

महिला दिन :कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो…

महिला मोहताज नही
किसी गुलाब की,
वो खुद बागवान हैं,
इस कायनात की…

          आज  ८ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. भारतात तर महिलादिनाच्या निमित्ताने महिला दिन (दिवस) की महिला दीन (दुबळ्या, गरीब, बिचार्‍या) अशी स्थिती असल्याची चर्चा सातत्याने होत असते, भारतात लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के अर्थात सुमारे ६५ कोटी महिला, मुली आहेत. सद्यस्थितीत महिलाही उच्च शिक्षण घेत असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. तर महिलांच्या सक्रिय सहभागाशिवाय सामाजिक प्रगती शक्यच नाही, असे अधोरेखीत होत आहे.  
          दुसरीकडे पुरुष प्रधान भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना विविध आरोपाने हिणविले गेले आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी ‘ढोल, गवार, शुद्र, पशु और नारी, यह सब ताडना के अधिकारी,’ याच उद्देशाने म्हटल्याचे प्रचारीत केल्या गेले. तसेच जर, जोरु (महिला), जमीन, यही फसाद की जड, असे मनावर उमटवून जोरु (महिला) वाईट असतात, असा समज पसरविल्या गेला. वास्तविक गोस्वामी तुलसीदास यांचे रामायण हे अवधी भाषेत १६ व्या शताब्दीतील असून ‘ताडना’ शब्दाचा अर्थ परखणे (पहचानना) असा होतो आणि त्यांच्या दोह्यातील उपरोक्त पाचही बाबी समजून घेण्याचे विषय आहेत, असा अर्थ संदर्भ देवून अभ्यासकांनी सांगितला आहे. मात्र चित्रपटात, विविध सिरीयलमध्ये महिला म्हणजे अशांती, कट कारस्थान, भांडणे-तंटे, भडकविणे, वगैरे वैगेरे भूमिकेत महिलांना रेखाटल्या गेले आहे. तर हजारो जोक्स बनवून महिलांना हिणविण्याचे प्रकार झाले. आता मात्र काळ बदलला आहे.
      युगाचा विचार केला तर सत्ययुगात व त्रेतायुगात आशिर्वाद देणार्‍या लक्ष्मी, ‘देवी’ प्रमाणे महिलांचे महत्त्व राहीले, नंतर व्दापरयुगात ‘सती’ अर्थात सात्वीकता धारण केलेल्या तसेच नंतर कलियुगात प्रथमत: ती विरांगनाचे भूमिकेत अर्थात झाशीची राणी व अहिल्याबाई प्रमाणे शूर, लढवय्या झाल्यात आणि कलियुगातच आता आधुनिक सक्षम, परिपूर्ण अशा भूमिकेत महिला असल्याचे सांगता येईल. महिलांची सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक सोबतच परिश्रमातही भागीदारी वाढली असून त्यांच्यातील जिद्द व चिवटपणा त्यांना  प्रत्येक क्षेत्रात मोठे करीत आहे.  मात्र असे असले तरी महिलांना अजून बराच संघर्ष करावा लागेल, मोठा टप्पा गाठावा लागेल, आणि त्यासाठी काही सुत्र आत्मसात करावे लागतील. त्यामध्ये एक महत्वाचे सुत्र आहे, ‘‘कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो,’’ अर्थात ‘कमी बोला, हळू बोला, आणि गोड बोला’.
       भारतात राजस्थानमधील माऊंटअबू येथे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या ब्रह्माकुमारीच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या आध्यात्मिक संस्थेचे ‘कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो,’ हे स्लोगन आहे. महिलांव्दारा संचालीत महिलाच मुख्य प्रशासक असलेल्या सुमारे १४० देशात कार्य करणार्‍या या एकमेव आध्यात्मिक संस्थेत सुमारे २० हजार ब्रह्माकुमारी एकूण नऊ हजार केंद्रावर सेवा देतात आणि आध्यात्मिकता सोबत उपरोक्त स्लोगनची अनुभूती करुन देत आहेत. ब्रह्माकुमारीजशी जुळलेल्या सुमारे दहा लाख सदस्यांनी या स्लोगनची शक्ती अनुभवली असून यामुळे त्यांच्या आयुष्यातील बर्‍याच समस्या सुटल्या आहेत. म्हणून महिलादिनाचे निमित्ताने ब्रह्माकुमारीजच्या कार्याची आठवण क्रमप्राप्त ठरते.  
           प्रथमत: प्रत्यक्षात व्यवहारात व नातेसंबंधात कमी बोलणे खूप फायद्याचे ठरते, तसेही काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला कळले त्याच्या आयुष्यातील ‘महाभारत’ टळले, असे म्हणता येईल.
             दुसरे हळू बोलणे हे आरोग्यासाठी तसेच मानसिकतेसाठी जास्त योग्य असल्याचे आरोग्य तज्ञांनी स्पष्ट केलेले आहे. यामुळे ऐकणाराही काळजीपूर्वक ऐकतो, तर मानवी उर्जाचीही बचत होते.
      तीसरे म्हणजे गोड अर्थात मधुर बोलणे, हे तर आपले अर्धे काम पूर्ण करवून घेण्याची गुरुकिल्ली आहे. कोणालाही लागेल किंवा त्याचे मन दुखावणारे शब्द हे शस्त्राचे काम करतात. आपुलकी व आदर नष्ट करतात.  
      उद्या जागतिक महिलादिन असल्याने महिलांची महती व कार्यकुशलता सांगणारे, कर्तृत्त्ववान महिलांच्या सत्काराचे कार्यक्रम होतीलच मात्र उपरोक्त स्लोगनचा संकल्प, शपथ, वचन घेण्याचे व देण्याचे कार्यक्रम झालेत तर सर्वांचेच आयुष्य अमृत होईल, एवढे मात्र खरे.

एकूणच महिलांना मान, सन्मान, योग्य ते आदराचे स्थान फक्त कायद्याने नव्हे तर मनातून दिले गेले पाहिजे. तरच खर्‍याअर्थाने महिलादिन रोज साजरा होऊ शकेल.
शेवटी या आशयाचा शेर आठवतो…
बस एक दिन
क्यों नारी के नाम मनाना हैं।
हर दिन हर पल नारी उत्तम मानो
यही आज का जमाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here