सचिन सातव यांच्या शुभहस्ते कै. पैलवान बाबुराव साळुंखे व्यायाम शाळेच्या नाम फलकाचे उद्घाटन संपन्न
प्रतिनिधी: ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती तालुका नाभिक समाज बांधवांच्या वतीने बारामतीतील कसबा येथील संत सेना नगर मधील कै. पैलवान बाबुराव साळुंखे व्यायाम शाळेच्या नामपलकाचे उद्घाटन बारामती नगर परिषदेचे गटनेते तथा बारामती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन सचिन सातव नगरसेवक सुरत सातव यांच्या शुभहस्ते तर सर्व नाभिक समाजातील समाज बांधव व महिला यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रमुख पाहुणे, मुख्य मार्गदर्शक बारामती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन तथा बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेद्र यादव यांनी केले तर प्रस्ताविकात नमुद केले की “कै. पैलवान बाबुराव साळुंखे” नेहमी म्हणत की ह्या तरुण पिढी सुदृढ राहण्याच्या करिता व्यायाम शाळा कसरती करिता इमारत शाळा उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. या ठिकाणी मोठा समारंभ होण्याच्या करिता हॉल उपलब्ध व्हावा ,व्यायाम शाळेची निर्मिती असे उद्दिष्ट आपल्या प्रास्ताविकात श्री. यादव यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी बारामती नगर परिषदेचे गटनेते तथा बारामती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन सचिन सातव म्हणाले की कै. पैलवान बाबुराव साळुंखे यांचे विचार पुढे नेण्याचे प्रयत्न करणार आहोत तसेच ते पुढे म्हणाले की आता बारामती नगर परिषद चा कारभार प्रशासन पाहत आहे तरी येणाऱ्या पुढील काळात बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून अजितदादा पवार व संपूर्ण पवार कुटुंबीयांच्या मदतीने कै. पैलवान बाबुराव साळुंखे व्यायाम शाळेची दोन मजली इमारत उभारण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
असा मी या नामफलक अनावरण प्रसंगी बारामती तालुका नाभिक संघटनेला शब्द देतो..
श्री. सातव पुढे बोलताना म्हटले की कसबा येथील या गल्लीत अनेक गल्ली आहेत विविध समाज बांधव राहतात. विविध समाज बांधवाप्रमाणे बारामती नाभिक बांधवांच्या विविध कार्यक्रम व्हावेत करिता २ मजली देखणी व्यायाम शाळा तसेच सभागृह इमारत उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असा शब्द त्यांनी नाभिक संघटनेला यावेळी दिला.
यावेळी नगरसेवक सुरज सातव नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने उपाध्यक्ष सुदाम कढणे सचिव किरण कर्वे यांच्यासह सर्व नाभिक समाज बांधव , व महिलां उपस्थित होत्या.
याप्रसंगी समाजातील महिलांचा ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुलाबपुष्प देऊन सर्व महिला भगिनींना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या तसेच अल्पोपहार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुरेश साळुंखे यांनी केले तर आभार सुदाम कढणे यांनी मानले .