बारामतीत नवमतदार नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ फेब्रुवारीपर्यंत दावे-हरकतींचे आवाहन…
बारामती : संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१-बारामती विधानसभा मतदारसंघातील छायाचित्र मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक नोंदणी अधिकारी जितेंद्र दुडी यांनी प्रारूप मतदारयादी जाहीर केली असून नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.
नाव मतदारयादीत नसल्यास फॉर्म ६ भरून नवीन नोंदणी करता येणार असून नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरावा लागणार आहे. प्राप्त दावे-हरकतींवर ६ मार्चपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने नवमतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असून युवक-युवती मोठ्या संख्येने नोंदणीसाठी पुढे येत आहेत. संबंधित कागदपत्रांसह नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानाचे सूर्यानगरी मोतानगर शेजारी आयोजन नगरसेवक श्री. प्रवीण दत्तू माने व नगरसेविका सौ. रुपाली नवगाथ मलगुंडे यांनी केले आहे.
या भागातील मतदार नोंदणीसाठी पुन:यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छुक नवमतदार मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहेत..!





