“पक्षनिष्ठा हीच खरी ताकद!” – ‘परखड वक्ता, दूरदर्शी नेता’ दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा स्पष्ट संदेश
इंदापूर | ता. २८ डिसेंबर २०२५
“पक्ष निष्ठेशी प्रामाणिक राहून कार्यकर्त्यांनी सातत्याने काम करत राहावे,” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (भरणे मामा) यांनी केले.
अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी राहुल लावर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘परखड वक्ता, दूरदर्शी नेता’ या दिनदर्शिकेचे हे तिसरे वर्ष असून, यंदा तब्बल ५,००० प्रतींचे वितरण इंदापूर व बारामती तालुक्यात करण्यात येत आहे.
या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा भरणेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सारिका ताई भरणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भरणे मामा म्हणाले,
“पक्षाचे विचार, ध्येय आणि धोरणे ही तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत. अशा उपक्रमांमधूनच पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचते.”
याप्रसंगी त्यांनी या उपक्रमासाठी राहुल लावर यांचे मनापासून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बळाला दिशा देणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.




