बारामतीत येत्या सोमवारी सलून दुकाने बंद…! नाशिक जिल्ह्यातील १० वर्षाच्या बालिकेवरील अत्याचार- प्रकरणी जाहीर निषेध..!

0
34

महराष्ट्रात नाभिक समाजातून संतापाची लाट…!


बारामतीत सलून दुकाने सोमवारी बंद…! जाहीर निषेध

प्रतिनिधी – बारामती

नाशिक जिल्ह्यातील खामगाव तालुका (जि. नाशिक), बलालगाव येथे घडलेल्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचाराच्या विरोधात धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजात प्रचंड संताप निर्माण झाला असून त्या गरीब कुटुंबातील मुलीला खाऊचे अमिष दाखवून, धमकावून आणि दमदाटी करून गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीने पाशवी अत्याचार केल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत.

घटनेनंतर आरोपी गावातून फरार झाला असून, त्याचे गावगुंडाशी संबंध असल्याची माहिती समोर येते. पीडित कुटुंब एकटे असल्याचा गैरफायदा घेत गावातील काही लोक त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असून, गावातून बाहेर हाकलण्याचा देखील दबाव आणला जात आहे.
या भयानक घटनेचा तीव्र निषेध नोंदवत बारामती तालुका नाभिक संघटना आणि नाभिक महामंडळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून खालील… तातडीच्या मागण्या केल्या आहेत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी!
मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणीआरोपीला तत्काळ अटक व कठोर शिक्षा व्हावी!
खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा!
‘पीडित मुलगी व कुटुंबाला तात्काळ संरक्षण द्यावे! असे
निवेदनाव्दारे रोहन शहाजी शिंदे – अध्यक्ष, बारामती तालुका नाभिक संघटना,
आदर्श संजय आपुणे – सचिव,
तसेच धिरन पवार – अध्यक्ष, बारामती तालुका नाभिक महामंडळ
आणि समाजातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बारामतीत सोमवारी जाहीर निषेध! अत्याचाराच्या तीव्र निषेधार्थ सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी
बारामती शहर व तालुक्यातील सर्व नाभिक सलून दुकाने सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे समाजातील असंतोष आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची तळमळ स्पष्ट दिसून येते.

घटना प्रकाशात येताच संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजा संतापाची लाट उसळली आहे. एका गरीब, असहाय कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एवढ्या पाशवी पद्धतीने अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पीडित मुलीला न्याय, कुटुंबाला संरक्षण आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण नाभिक समाज एकवटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here