बाबासाहेब गेले
काळीज पिळवटणारी दुःखद वार्ता
काळजावर दणाणून गेली
धडाधड माणसं कोसळली
मनानं….
ऊर बडवून, श्वास घुसमटून
बाया बापड्या भेदरून गेल्या
अंतिम वाटणारा
काळजाचा प्रत्येक ठोका
धडधडून सांगत होता
सावली धरून ठेवलेला
तो बाप गेला..
आधार गेला
अन् आमचं
जगण्याचं बळच सारं
उपसून गेलं…
पण,
आक्रोशातून
कोलाहलातून
अश्रूच्या थेंबा थेंबातून
एक अस्फूट आवाज
काळीज पेरत होता…
” पिढ्यानपिढ्या मला
जिवंत ठेवायचं असेल तर ..
फक्त माझ्या विचारांचा
अंत होऊ देवू नका!
ऊठा!शिका!संघटित व्हा!!”
(महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏)
©️ अंजली राठोड श्रीवास्तव
७७०९४६४६५३




