उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विशेष आभार …केज नगरपंचायतसाठी मोठा दिलासा – व्यापारी संकुलासाठी जागा हस्तांतरित…!
केज (ता. केज) – केज येथील फुल उत्पादन जिरायत खाते विभागाची जागा केज नगरपंचायत कडे व्यापारी संकुल उभारणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे केज शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज व नियोजनबद्ध सुविधा उभारल्या जाणार आहेत.
नगरपंचायत प्रशासन व नागरिकांनी या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. दादांच्या पुढाकारामुळे नगरपंचायतीला व्यापारी संकुलासाठी अत्यंत महत्वाची जागा मिळाल्याने येथील व्यापारी वर्ग व सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आल्यानंतर, शहरातील व्यापाऱ्यांना सुसज्ज व एकाच ठिकाणी दुकाने उपलब्ध होतील. तसेच शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना खरेदीसाठी आवश्यक सुविधा एका छताखाली मिळणार आहेत.
या निर्णयामुळे केजच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले.
केजकरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे यासाठी विशेष आभार व्यक्त केले आहेत.