“रुई (बाबीरनगरी)त भव्य नागरी सत्कार सोहळा; सरपंच आकाश कांबळे यांच्या अभिष्टचिंतनाने गावात उत्सवाचा माहोल”
इंदापूर (प्रतिनिधी):
रुई (बाबीरनगरी) गावात येत्या रविवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) सरपंच तथा भाजपा पुणे जिल्हा महामंत्री मा. आकाश नंदा विलास कांबळे यांच्या अभिष्टचिंतन व भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दिवसभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांनी संपूर्ण गाव उत्सवाच्या जल्लोषात नटणार आहे.
सकाळी श्री क्षेत्र बाबीर देवस्थानात महापूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल.
वावीरनगटी ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
रूई बाजारतळावर सर्व रोग निदान आरोग्य शिबिर ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरणार आहे.
दुपारी सरपंच आकाश कांबळे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरचे उद्घाटन व वास्तुपूजन होणार आहे.
संध्याकाळी ७ वाजता होणारा भव्य अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळा हा दिवसाचा शिखरबिंदू ठरणार असून, जिल्ह्यातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दणक्यात साजरा होणार आहे.
रात्री ९ वाजता खुल्या डान्स स्पर्धेने या सोहळ्याला सांस्कृतिक रंगत चढणार आहे.
हा कार्यक्रम नवनिर्माण प्रतिष्ठान, ग्रामपंचायत रुई व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून आयोजकांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
