




बारामती-पुणे नॉन स्टॉप बसेस गायब; प्रवाशांची प्रचंड गर्दी, खाजगी वाहनांचा गैरफायदा – ₹४०० पर्यंत तिकीट दर
बारामती :
पुणे-बारामती मार्गावरील नॉन स्टॉप बससेवा पूर्णपणे कोलमडली आहे. दर अर्ध्या तासाला धावणाऱ्या या बसेस तास-दीड तास उलटूनही निघालेल्या नाहीत. त्यामुळे बारामती एस.टी.स्थानकाबाहेर पाच बसेस भरतील एवढी प्रचंड गर्दी उसळली असून प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे.
गर्दीचा गैरफायदा खाजगी वाहनांचा
सरकारी बसेस थांबल्याने खाजगी वाहनधारकांचा धंदा रंगला आहे. साधारण ₹२००-२५० रुपयांत मिळणाऱ्या प्रवासासाठी चारशे रुपये तिकीट मागितले जात आहेत.
“गर्दीतून बस मिळणार नाही, गाडीत चढा नाहीतर पुण्याला वेळेत पोचणार नाही” असे सांगत प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे.
प्रवाशांचा आक्रोश
बस वेळेवर सोडा.”
“खाजगी वाहनवाल्यांचे दर वाढले
संतप्त प्रवाशांनी एस.टी. प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, सर्वाधिक गर्दीच्या पुणे-बारामती मार्गावर असे वारंवार वाहतूक विस्कळीत कशी होते?