
बारामती शहरामध्ये प्रथमच अठरा वर्षावरील मतिमंद मुलासाठी कार्यशाळाचे स्थापना
शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 18 वर्षावरील मतिमंद मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुण विकसित करण्यासाठी स्वावलंबी जीवन व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बारामती शहर, परिसरातील बौद्धिक अक्षमता (मतिमंद) बालकांसाठी बारामती शहरात प्रथमच शौर्या बहुउद्देशीय संस्था बारामती संचलित, शिवगुरु मतिमंद मुलांची कार्यशाळाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी मातोश्री व विद्यार्थी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले खालील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी मुक्ती ग्रुप बारामती, श्री राजेंद्र गायकवाड सरपंच पिंपरे खुर्द, महेंद्र उंडे साहेब, डॉक्टर अशोक डोमाळे, प्रज्ञा काटे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या व संस्था पदाधिकारी शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सूत्रसंचालन श्रीमती ज्योती मुंडे मॅडम प्रस्तावना श्रीमती मानसी जाधव यांनी केली संस्था अध्यक्ष श्री मुत्याप्पा व्हनकांबळे सर यांनी आमचे जीवन, स्वावलंबी जीवन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे संस्था मुलांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी व त्यांना समाजात स्वावलंबी जीवन कसे जगता येईल यासाठी संस्था नियमित प्रयत्नशील राहील असे सांगितले यामध्ये खडू तयार करणे, पणती रंगकाम करणे ,अगरबत्ती तयार करणे कॉस्मेटिक व डेकोरेशन साहित्य तयार करणे, या उपक्रमावर भर असेल असे संस्थेच्या सचिव श्रीमती योजना चव्हाण मॅडम यांनी सांगितले व कार्यक्रमाचे आभार श्री किशोर जाधव सर यांनी मानले.