

ज्ञानदेव संगीत क्लासेसतर्फे भव्य गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड :
माऊली श्री ज्ञानोबारायांचा ७५० वा जन्मोत्सव सुवर्णकलश रोहण सोहळा आणि गुरुपूजन कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलंकापुरी पुण्यनगरीत ज्ञानदेव संगीत क्लासेस शिष्यवर्ग, साधक व विद्यार्थिनींच्या माध्यमातून भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने संपन्न झाला.
सकाळी बारा वाजता मंगल गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या भजन, अभंग, गवळणींनी सभागृहातील वातावरण आध्यात्मिक झाले. गुरुचरित्राचे वाचन, संतवाणीचे गायन, तसेच शिष्यांनी आपल्या कलाविष्कारातून गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते आदरणीय श्री. निवृत्ती बोराटे सर तसेच पिंपरी चिंचवड महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनातून गुरुशिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाला पालकवर्ग, पंचक्रोशीतील अध्यात्मिक साधक, रसिक भक्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शिस्तबद्ध व भक्तिभावाच्या वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला.
शेवटी राम कृष्ण हरी या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली. आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.