मराठी भाषा गौरव दिन

0
185

मराठी भाषा गौरव दिन
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , मराठी भाषेचे अग्रगण्य कवी ( जन्म २७.२.१२- १०.५.९९ )
कविवर्य कुसुमाग्रज यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्यानं शासनानं
२७/२ हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा असा कौतुकास्पद निर्णय घेतला.
पण वाईट वाटतं की आजही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही.
“उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ
दूर मनो-यात
अन् लावा ऋदयात सख्यांनो
आशेची वात”…
( विशाखा)
ओठात आणि पोटात घेऊन फिरणारी मायमराठी बोली लाखो साहित्यिकांच्या माध्यमातून समृद्ध झाली आहे.होत आहे.मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी आपण मिळून लढा दिला पाहिजे.
मराठी ही प्राचीन काळापासून चालत आलेली सहज सोपी अशी भाषा आहे.हे कोणी नाकारू शकत नाही.
इतर भाषांना हा दर्जा मिळतो मग मराठी भाषेला का सवती सारखी वागणूक?
तिचा ही एक दरारा आहे.तिची ही एक वेगळी ओळख आहे.सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची आमची मराठी भाषा आम्हाला प्रिय आहे.
डॉ पठारे समितीनं मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा कशी आहे याचे पुरावे ते सर्व निकष केंद्र सरकारला देऊन ही तो दर्जा अजूनही मिळालेला नाही.तो प्रस्ताव आज ही कुठल्या तरी कोनाड्यात धूळ खात पडावा.ही कितीतरी दुर्दैवी गोष्ट आहे.
साहित्य, समाज ,सांस्कृतीक इ.क्षेत्रांच्या माध्यमातून हा लढा देणं खरंच गरजेचं आहे.
अभिमानं सांगावसं वाटतं की आज आठ ते नऊ कोटी लोकसंख्येच्या माध्यमातून मराठी भाषा बोलली जाते.ती महाराष्ट्र पुरती मर्यादित तर मुळीच नाही.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा जरी असली तरी ती इतरही राज्यात बोलली जाते.मग का नसावा अभिमान आम्हाला माय मराठीचा? महाराष्ट्राला समृद्ध असा साहित्य ,सांस्कृतिक अशा कलेचा वारसा लाभलेला आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या माय मराठीला आपण आणखीन समृद्ध करण्यासाठी चला तर कटिबद्ध होऊया!
अनेक शाळांमधून ,शिक्षणात मराठीचा वापर वाढवणं तो जोपासणं आज काळाची गरज बनू पाहत आहे.मराठी भाषेचा विकास आणि महाराष्ट्राचा साहित्य आणि सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी आपण रान पेटवून उठलं पाहिजे.
“अभिमानानं गर्जतो मराठी
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
जगा मराठी
बोला मराठी
जपा मराठी”
©️®️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here