

वडगाव निंबाळकर येथे नाभिक समाजाच्या वतीने पारंपरिक नागपूजन; सौ. संगीतादेवी राजे निंबाळकर यांच्या हस्ते पूजन
वडगाव निंबाळकर | २९ जुलै २०२५
वडगाव निंबाळकर येथील श्री महादेव मंदिर बाजारतळ येथे नाभिक समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने श्री नागदेवतेची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगी नागदेवतेच्या मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या नागपूजनाचा मान वडगावच्या माजी सरपंच तथा भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमंत सौ. संगीतादेवी राजे निंबाळकर यांना देण्यात आला. त्यांनी विधीवत पूजन व आरती करून नागदेवतेची आराधना केली.




या कार्यक्रमास श्री. राजेंद्र राजे निंबाळकर, श्री. सचिन साठे, श्री. सुनील खोमणे, तसेच संत सेना महाराज मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वडगाव निंबाळकर गावातील अनेक प्रमुख नागरिक, महिला व युवकांनीही उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली.
या पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रमाने गावात एकात्मतेचा व भक्तिभावाचा संदेश दिला.