विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांची ३६ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ साठी निवड.
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी शाखेत शिकणारा विद्यार्थी कु. ओम गायकवाड याची ३६ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ साठी निवड झाली आहे. हा महोत्सव “जैन डीम्ड युनिव्हर्सिटी- बंगलोर येथे होणार आहे” लोक वाद्यवृंद कार्यक्रमासाठी तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या तो आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ च्या तयारीसाठी बंगलोर येथील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेत आहे
त्याच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर, विद्यार्थी कल्याण कक्ष अधिकारी प्रा. हनुमंत बोराटे तसेच सास्कृंतिक अधिकारी प्रा. पल्लवी बोके यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज या सर्वानी यांनी त्याचे कौतुक केले व त्याला त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized बारामती येथील विद्यार्थ्यांची ३६ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ साठी निवड.