गुरुपौर्णिमेनिमित्त लासुर्णे गावात मातृ-पितृ पूजन व भव्य कीर्तन महोत्सवाने अविस्मरणीय भक्तिमय पर्वणी…!

0
14

गुरुपौर्णिमेनिमित्त लासुर्णे गावात मातृ-पितृ पूजन व भव्य कीर्तन महोत्सवाने अविस्मरणीय भक्तिमय पर्वणी!

लासुर्णे (ता. इंदापूर, जि. पुणे) | श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम घडवणारा एक अद्वितीय सोहळा लासुर्णे गावाने यंदाच्या गुरुपौर्णिमेला अनुभवला. अध्यात्मभूषण ह.भ.प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांनी आपल्या आई-वडिलांचे भावविवश करणारे मातृ-पितृ पूजन करत आजच्या पिढी समोर एक अजरामर आदर्श उभा केला. “गुरू म्हणजे फक्त संन्यासी नाही, आई-वडील हेसुद्धा आपले पहिले गुरु आहेत” हा संदेश या पूजनातून प्रभावीपणे उमटला.

पूजनानंतर रसिक भक्तांसाठी पर्वणी ठरली ती वाणीभूषण ह.भ.प. श्री. संतोष महाराज कौवठाळे देवदैठणकर यांच्या भारावून टाकणाऱ्या हरिकीर्तनाने! त्यांची वाणी, त्यांचा आवाज, त्यांचे शब्द म्हणजे जणू संत ज्ञानेश्वरांचीच पुनरावृत्ती.
“अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा” या गूढ मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हालं. उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यांतून आसवांचे पूजन वाहू लागले!
कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आणि दर्जेदार आयोजन
या संपूर्ण अध्यात्मिक सोहळ्याचे नेटके आयोजन ह.भ.प. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत, कुमारी तेजश्री गोरे, महाराष्ट्र पोलीस कुमार राम गोरे व सौ. शाम गोरे यांनी हृदयाशी घेऊन केले. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्यात भक्तीचा अनुभव, संस्कृतीचे दर्शन आणि कुटुंबमूल्यांची प्रचीती मिळाली.

अतिथींची मान्यवर उपस्थिती:
गावकऱ्यांच्या साक्षीने आणि गुरूच्या कृपाछायेने हा सोहळा अधिक तेजस्वी झाला . उपस्थिती पृथ्वीराज जाचक (बापू) – अध्यक्ष, भवानीनगर साखर कारखाना व विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ डॉ. योगेश पाटील साहेब – संचालक अमोल पाटील साहेब – माजी उपाध्यक्ष मा. संचालक सर्जेराव जामदार सूत्रसंचालन उमेश रुपनवर साहेब यांनी रसाळ भाषेत कार्यक्रमाचे संचालन करत भक्तिमय वातावरण अधिकच भारले.
गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद


या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भक्तगण, मित्रपरिवार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येत दिव्य आणि पवित्र गुरुपौर्णिमा साजरी केली. लासुर्णे गाव एकाच क्षणी जणू संत साहित्यातील अध्यायच बनलं.

गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ
ही केवळ पूजन किंवा कीर्तनाची गोष्ट नव्हे, तर एक भावनिक, आध्यात्मिक आणि संस्कृतीप्रेमाने भरलेली पिढ्यान् पिढ्यांची प्रेरणा ठरणारी घटना होती. लासुर्णे गावाने गुरुपौर्णिमेला केवळ साजरं केलं नाही, तर तिला आपल्या संस्कृतीच्या मुळाशी नेऊन जपलं.

— “गुरुकृपा ही जीवनाची खरी संपत्ती आहे आणि त्या कृपेची वाट दाखवणारा हा सोहळा लासुर्णे गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here