गंगाधर काळे यांचे दुःखद निधन….!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
फोटोग्राफी क्षेत्रात अढळ स्थान निर्माण करणारे, बारामतीतील प्रसिद्ध माणिक फोटो स्टुडिओ चे आधारस्तंभ,
गिरीश काळे यांचे वडील गंगाधर काळे यांचे दि.३० एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.
शब्दही हरवतात, अशा या अपूरणीय दुःखात…
गंगाधर काळे हे केवळ एक अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर एक मनमिळावू, हसतमुख आणि समाजात आपुलकीने वावरणारे व्यक्तिमत्त्व होते.
पवार कुटुंब आणि बारामतीकरांसोबत त्यांचा फोटोग्राफीचा प्रवास अनेक आठवणींनी भरलेला आहे. जुने फोटो, नव्या आठवणी आणि हृदयाशी जपलेले क्षण… सर्व काही त्यांच्या हातून अमर झाले.
साप्ताहिक भावनगरी व शिंदे परिवाराच्या वतीने त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
काळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
आपली कला जगात राहील, पण तुमची उणीव कायम भासेल…
तुमच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली…
