!!श्री रामनवमी….!!

0
12

|| श्रीरामनवमी शुभेच्छा ||
साप्ताहिक भावनगरीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥

श्रीरामांचे चरित्र इतके व्यापक आहे की ते शतकोटी शब्दांतही सामावणार नाही. त्यातील प्रत्येक अक्षर हे पापांचे उच्चाटन करणारे आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम् ॥

नीळ कमळासारखा श्यामवर्ण, कमळसारखे नेत्र, सीता-लक्ष्मणासह, जटांनी सुशोभित मुकुट धारण केलेला श्रीराम ध्यानात घ्यावा.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥

धनुष्य-बाणसह सज्ज असलेला, अधर्मी राक्षसांचा अंत करणारा,
आपल्या दिव्य लीलांनी जगाचे रक्षण करणारा, अजन्मा आणि सर्वव्यापी प्रभू श्रीराम.

रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥

शहाण्या भक्ताने रामरक्षा पाठ करावी. ती पापांचे उच्चाटन करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. माझे शिर राघव (राम) आणि कपाळ दशरथपुत्र राम रक्षण करो.

सुप्रभात! राम राम!
रामनवमीच्या या पवित्र दिवशी प्रभू श्रीराम तुमच्या आयुष्यात
धैर्य, सत्य, प्रेम आणि शांतीचे अधिष्ठान देवो,
अशा मन:पूर्वक शुभेच्छा!

– साप्ताहिक ‘भावनगरी’ परिवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here