डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयात यूपीएससी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न
बारामती │ डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती आणि वाजिराम अॅड रवी इन्स्टिटयूट फॉर आयएएस एक्झामिनेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रात प्रा. कृष्णा भोकरे (संस्थापक, कृष्णा भोकरे इन्स्टिटयूट फॉर अॅग्री ऑप्शनल आणि फॅकल्टी, वाजिराम अॅड रवी इन्स्टिटयूट, दिल्ली) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य तयारी आणि अभ्यासक्रम समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, स्वतःवर विश्वास ठेवून, नियोजनबद्ध सराव आणि तणाव व्यवस्थापन यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख मा. राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, शिक्षण संचालक निलेश नलावडे, एचआर गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड, प्राचार्या श्रीमती जया तिवारी, प्राचार्य प्रा. ए. रासकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी, अॅग्री ऑप्शनलचे महत्त्व, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेचे स्वरूप, तणाव व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील करिअर संधी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानवी बागल यांनी केले तर आभार कृष्णा पागीरे यांनी मानले. चर्चासत्राला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

