डॉ.मेघा फिरोदिया यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..!

0
56

डॉ.मेघा फिरोदिया यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न.

पुणे (दि.२१) ऑटीझम रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग सेंटरच्या मदतीसाठी आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नियोजित प्रांतपाल संतोष मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. रजा रविवर्मा कलादालन घोले रोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल संतोष मराठे,चित्रकार डॉ.मेघा फिरोदिया, ऑटीझम रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग सेंटरच्या चेअरमन कीर्ती केळकर डॉ.मनीष फिरोदिया आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.या प्रदर्शनात सुमारे २५० चित्रे असून याच्या विक्रीचे सर्व पैसे ऑटीझमग्रस्त मुलांसाठी देण्यात येतील. हे प्रदर्शन २१ ता शुक्रवार २२ ता.शनिवार व २३ तारीख रविवार वेळ सकाळी ११ ते ६.३० या वेळात सर्वांना विनामुल्य खुले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here