प्रताप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसाप्ताहिक भावनगरी कडून सविनय आदरांजली…!

0
6

प्रताप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
साप्ताहिक भावनगरी कडून सविनय आदरांजली

महाराष्ट्र सायकल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सायकलिंग क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले प्रताप जाधव यांचे दुःखद निधन हे सायकलिंग विश्वासाठी मोठी अपूरणीय हानी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रताप जाधव यांनी सायकलिंगच्या क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी अनेक सायकलपटूंना घडवले आणि सायकलच्या माध्यमातून महाराष्ट्रात आरोग्यदायी जीवनशैलीची चळवळ उभी केली. सायकल व प्रताप जाधव यांचे नातं अतूट होते. ते स्वतः सायकलवर अविरत प्रवास करत, सायकलच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा देत राहिले.

माझ्या मुलासाठी पुण्यात एमटीबी सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी प्रताप सरांची भेट घेतली होती. त्या वेळेस आमची पहिली ओळख झाली. ते “घाटाचा राजा” म्हणून प्रसिद्ध असलेल्या सायकलपटू झेंडे यांचे मित्र होते. या ओळखीच्या माध्यमातून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. गेली चार-पाच वर्षे आमच्यात घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध राहिले. त्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने अनेक सायकलपटूंनी प्रगती केली.

सामान्य कुटुंबातून आलेले प्रताप जाधव यांचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे आणि प्रेरणादायी होते. त्यांनी सायकलिंग क्षेत्रात केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही आपले योगदान दिले. त्यांनी सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यवर्धक जीवनशैलीसाठी समाजात जनजागृती केली.

त्यांच्या निधनाने सायकलिंग विश्वात एक शून्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने जरी एक युग संपले असले, तरी त्यांच्या कार्याची आणि सायकलप्रेमाची आठवण सदैव आमच्या मनात राहील.

साप्ताहिक भावनगरी कडून त्यांना सविनय श्रद्धांजली.
आपली आठवण सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील.

Previous articleबारामतीमध्ये आरपीआय मातंग आघाडी शाखांचे दिमाखात उद्घाटन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here