औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे बुधवारी आयोजन

0
8

औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे बुधवारी आयोजन

पुणे, दि. 11: औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे एमसीसीआयए हॉल, ५ वा मजला, पुणे येथे बुधवार १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. गुंतवणूक परिषदेअंतर्गत पुण्यात सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम व मोठे उद्योजक यांनी गुंतवणूक करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. या परिषदेमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

परिषदेमध्ये उद्योजकांसाठी विविध प्रकारचे चर्चासत्र आयोजित केले असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नव उद्योजक, निर्यातदार व उद्योग घटकांनी परिषदेला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here