प्रतिनिधी: ९ मार्च ला बारामतीत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चा….!
बारामतीत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय निषेध मोर्चा…. आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा शनिवार, ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा, बारामती येथून काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांचा सहभाग या मोर्चात असणार आहे. सर्व समाजबांधवांना, सामाजिक संघटनांना आणि युवकांना मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन…
बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चासाठी जोरदार तयारी
बारामती: स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ आणि दोषींवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता सर्वधर्मीय निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बारामती येथून काढण्यात येणार आहे. आयोजकांनी या मोर्चात प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मागील 8 मार्च रोजी बारामती बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता आणखी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली
निष्पक्ष चौकशीची मागणी
समाज एकजुटीचे प्रदर्शन
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी “हा लढा न्यायासाठी असून, सर्वांनी एकत्र यावे” असे आवाहन केले आहे
