रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनची आढावा बैठक संपन्न.
पुणे (दि.४) रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनची प्रांतपाल भेट म्हणजेच आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी प्रांतपाल शीतल शहा यांनी रोटरी क्लब फॉरच्यूनच्या कार्याची माहिती घेतली,तसेच पुढील कार्यासाठी उपयुक्त सुधारणा – सूचना केल्या.व आगामी कार्यासाठी शुभेच्छा

दिल्या. हॉटेल ऑर्बीट आपटे रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी प्रांतपाल शीतल शहा,सहप्रांतपाल हेमंत पुराणिक,ALF वासवी मुळे,फौंडेशन डायरेक्टर किरण इंगळे, रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष शिरीष प्रभू,सेक्रेटरी शिल्पा तोष्णीवाल,असित शहा,दीपक तोष्णीवाल.आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,तसेच रोटरॅक्ट(युवा रोटरी सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते. शितल शहा यांनी बोलतांना रोटरी करीत असलेले कार्य हे सेवा आणि परस्पर मैत्री वाढविणारे असते.तसेच नवीन सदस्य वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.
