अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करत पोलीस खात्यामध्ये भरती झाले.
बारामती (दि:१५)
त्यावेळेस अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पोलीस खात्यामध्ये भरती होत एक चांगल्या प्रकारचे काम स्वतःच्या हयातीमध्ये स्वर्गीय अर्जुनराव काळे यांनी करून दाखवले .असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार केले.
स्वर्गीय अर्जुनराव काळे यांच्या स्मरणार्थ डॉ. ऋतुराज अर्जुनराव काळे परिवाराच्या वतीने १ हजार गरजु महिलांना स्वेटर वाटप , पाचशे गरजू महिलांना साडी वाटप, १५ गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच सायकल वाटप कार्यक्रम विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते (दि:१५) रोजी करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर,मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी महेश रोकडे,
पुणे उद्योग अरविंद चांडक, मा. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, मा.नगरसेवक सुधीर पानसरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण, डॉ.गोकुळ काळे, डॉ रणजीत मोहिते, संयोग काळे, डॉ.सुनील काळे उपस्थित होते.
आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो.थंडीच्या काळात डॉ. ऋतुराज काळे यांनी स्वेटर वाटप करून मायेची,प्रेमाची उभ दिली. तसेच पाचशे गरजू महिलांना साडी वाटप, १५ गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच सायकल वाटप केल्याबद्दल डॉ. ऋतुराज काळे यांचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कौतुक केले.