बारामतीतील मुस्लिम व्यवसायिकांना ६.६३ कोटींच्या धनादेशांचे वितरण
बारामती : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या वतीने बारामती शहर आणि तालुक्यातील मुस्लिम समाजातील २२१ छोट्या व्यवसायिकांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एकूण ६ कोटी ६३ लाख रुपये वितरित केले जातील.
हा कार्यक्रम २३ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी ११:०० वाजता राष्ट्रवादी भवन, करहा, बारामती येथे होणार आहे.
प्रमुख उपस्थिती मा. सौ. सुनेत्रावाहिनी अजित पवार तालीका सभापती, राज्यसभा, खासदार
मा. श्री. मुश्ताक अंतूले चेअरमन, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई मा. श्री. गफार मगदुम एम.डी., मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
या कार्यक्रमाचे आयोजक मा. अलताफ सय्यद (संचालक, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे
हा उपक्रम मुस्लिम समाजातील लघुउद्योग आणि व्यवसाय वाढीस मदत करणारा असून, अनेकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देईल.
एकता ग्रुप, बारामती यांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
