दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान…!
नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक गुरु दलाई लामा यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार, त्यांच्या सुरक्षेसाठी ३३ कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
झेड सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत, दलाई लामा यांच्या निवासस्थानी १० सशस्त्र जवान तैनात राहतील, तर ६ जवान त्यांच्यासोबत सतत उपस्थित असतील.
दलाई लामा यांना १९४० मध्ये तिबेटच्या राजधानी ल्हासा येथे बौद्ध धर्मगुरू म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र, १९५९ मध्ये चीनविरोधी उठावानंतर त्यांना भारतात निर्वासित म्हणून येण्यास भाग पाडले गेले. तेव्हापासून ते भारतात वास्तव्यास आहेत.