बारामती: गरजू महिलांसाठी १००० मिक्सर वितरणाचा उपक्रम
बारामतीत गरजू महिलांसाठी १००० मिक्सर वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या हस्ते रविवार, ५ जानेवारी रविवार रोजी सकाळी कै. वसंतराव बाजीराव काळे नगर, बारामती येथे पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण (दादा) गुजर आयोजन डॉ. ऋतुराज (भैय्या) अर्जुनराव काळे यांनी केले यावेळी विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये महिलांना मिक्सर वाटप करून त्यांच्या जीवनात सोय आणि सक्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. ऋतुराज ( भैय्या) काळे यांनी केला.