तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

0
28

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री-शिक्षण, स्त्री सन्मान, समानता आणि समाजसुधारणा यावरील अमूल्य कार्य आणि प्रेरणादायी विचार हे आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून दि. ४ जानेवारी २०२५ रोजी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये महिला सबलीकरण समिती कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध मानसमित्र लेखक, लोकसेवक माजी प्राचार्य डॉ.सोपान बापू बोराटे, पुणे हे लाभले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमुळे महिलांचे होणारे सबलीकरण यांची सावित्रीबाईंच्या कवितेतून सांगड घातली. महिला सबलीकरण म्हणजे महिलांच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बदल, निर्णय क्षमता, आत्मसन्मान, शिक्षणामुळे होणारे अर्थार्जन इ. सांगून सावित्रीबाईंच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप अध्यक्षस्थानावरून म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवावी. जीवन सुंदर आहे सजग राहून त्याचा आनंद घेतला पाहिजे. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.अनिता पाटील यांनी केले होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी  या व्याख्यानाचा लाभ घेतला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here