बारामतीत १२ तासांत खुनातील आरोपींना अटक; पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

0
43
oplus_0

बारामती (दि. १९ डिसेंबर २०२४): बारामती शहरात गुरुवारी रात्री १०:३० वाजता प्रगतीनगर परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेतील आरोपींना बारामती पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या प्रकरणात नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (१९), महेश नंदकुमार खंडाळे (२१), व संग्राम दत्तात्रय खंडाळे (२१) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

मयत अनिकेत सदाशिव गजाकस याचा भाऊ अभिषेक गजाकस हा प्रगतीनगर येथून टीसी कॉलेजकडे जात असताना, आरोपींनी मोटारसायकलवर येऊन अनिकेतवर कोयत्याने हल्ला केला. नंदकिशोर अंभोरे याने मुलीशी बोलण्याच्या कारणावरून हा हल्ला करून अनिकेतचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या मोबाइल नंबरचा तपास करून व गुप्त माहितीदारांच्या मदतीने (सोलापूर जिल्हातील) अकलूज खंडाळी येथून दि,.(२० रोजी ) आरोपींना अटक केली.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गजानन चेके करत आहेत.

या गुन्ह्यातील जलद तपास व अटक ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस व स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक विलास नाळे, सतीश राऊत, कुलदीप संकपाळ व त्यांची टीम यांचे विशेष योगदान आहे. बारामती पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बारामतीत १२ तासांत खुनातील आरोपींना अटक; पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here