साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राचा सोळावा वर्धापन दिन…
साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राने १६ वर्षांचा प्रवास पूर्ण करताना बारामती परिसरात एक विचारमूल्य आणि सामाजिक बांधिलकी असलेले माध्यम म्हणून स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरते मर्यादित न राहता, त्या बातम्यांवर परखड विश्लेषण करणे आणि स्थानिक शासन, प्रशासन तसेच स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने विकासात्मक दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम भावनगरीने सातत्याने केले आहे. करत आहेत…
भावनगरी वृत्तपत्राने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील सर्वसमावेशक धोरणांवर लेखन करताना स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेपर्यंत प्रत्येक पातळीवर विकासात्मक धोरण मांडताना वृत्तपत्राने जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
याच कार्यप्रवृत्तीमुळे भावनगरीला वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि मित्रपरिवार यांचे उदंड प्रेम मिळाले आहे.
वाचक जाहिरातदार विक्रेते मित्रपरिवार हितचिंतक यांच्याच पाठिंब्यामुळेच हे वृत्तपत्र आज आपल्या विचारशील आणि परिणामकारक लेखनाचा ठसा उमटवू शकलेले आहे.
सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त एवढेच की भविष्यातही आमच्यातील हीच जिद्द, पराकष्ट, गुणवत्ता आणि सर्व घटकातील समाजासाठी सकारात्मक बदल घडविण्याची तळमळ कायम राहील,
आपल्या लेखणीने सतत नवा प्रकाश पाडत, सत्य आणि विकासाच्या वाटचालीला प्रोत्साहन देणाऱ्या भावनगरी वृत्तपत्राला पुढे ही भरभरून प्रेम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो . तर हितचिंतक जाहिरातदार, वाचक, विक्रेते तसेच आमच्यावर भरभरून प्रेम करणारे भावनगरी वृत्तपत्राचे चाहते शुभचिंतक मित्र परिवारांची मार्गदर्शकाची बस पाठीवर शाबासकीची थाप.. आणि आशीर्वाद हवाय…!
आपलाच संपादक
मित्र -, संतोष शिंदे भावनगरी
बारामती 9822730108