विद्या प्रतिष्ठान बारामती येथे विभागीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धा यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरमहाविद्यालयीन बेसबॉल (मुले) स्पर्धा दिनांक 15 व 16 डिसेंबर 2024 रोजी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मुख्य मैदानात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य डॉ. राजीव शहा तसेच विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी बारामती या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे तसेच पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेमध्ये एकूण सहा संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती द्वितीय क्रमांक कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, तसेच तृतीय क्रमांक विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयातील स्पर्धकांनी मिळविला. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. बिपिन पाटील तसेच क्रीडा समन्वयक श्री. संतोष जानकर यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले व या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या .