दौंड विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
पुणे, दि. 12: : दौंड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश मरकड यांनी दिली आहे.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार, ईव्हीएम नोडल अधिकारी तुषार बोरकर यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. मरकड यांनी दौंड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यांनतर एकूण 375 बॅलेट युनिट, 375 कंट्रोल युनिट आणि 406 व्हीव्हीपॅट यंत्राची सरमिसळ करण्यात आली. मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सरमिसळ प्रक्रियेच्या माध्यमातून निश्चित केली आहे. ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती श्री मरकड यांनी दिली.