सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करावे
मुंबई / प्रतिनिधी –
नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन आयोजित केले होते.या आंदोलनात महाराष्ट्रातील नाभिक समाज 10,000 च्या संख्येने उपस्थित होता.हे आंदोलन शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी किरण भांगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .
या आंदोलनामध्ये शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा,उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील
अध्यक्ष,उपाध्यक्ष,शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात,थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड,कार्यालय,माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.
13 सप्टेंबर 19 रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून दि.05 जाने 2024 रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी कऱण्यात आलेली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे,परंतु कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही.
त्यामुळे शासनाने 5 वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक समाजाची झाली म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या.या
आंदोलनात महाराष्ट्रातील युवक व महिला मोठ्या प्रमाणात होते.या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन,खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,आमदार राम सातपुते,आमदार संजय शिंदे,आमदार समाधान अवताडे,माजी आमदार नारायण पाटील,माजी आमदार प्रशांत परिचारक,माजी आमदार विजय शिवतारे,आमदार दत्ता भरणे इ.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठिंबा दिला.या आंदोलनास नाना पटोले,आमदार बालाजी किणीकर,आमदार संजय सावकारे, विजय चौधरी,माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील,योगेश केदार,शंकरराव लिंगे,संभाजीराजे दहातोंडे- पाटील,बाळासाहेब किसवे इ.सह विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळीनी भेटी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.पुढील मागण्या शासनाने मान्य न केल्यास लवकरच महाराष्ट्रातील नाभिक बांधवांच्या वतीने एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली.