समाज आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा..!–संजय एम.देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा व्दितीय स्नेहमिलन मेळावा मुंबईत संपन्न
अकोला– लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाज आणि पत्रकारांच्या न्याय हक्क आणणि कल्याणासाठी लढा देणारी समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना असून या संघर्षशील चळवळीमध्ये पत्रकारांनी सभासद आणि सामाजिक सेवाव्रतींनी मार्गदर्शक म्हणून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकशाहीतील हा संविधानिक प्रवाह अधिक समृध्द करावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय स़घटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी मुंबई येथील मेळाव्यात केले.संघटनेचा मुंबईतील व्दितीय विचारमंथन मेळावा ठाणे येथील हावरे सिटी मधील उन्नती ग्रीनच्या हॉलमध्ये त्यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी अरविंदराव देशमुख,पंजाबराव देशमुख,अमिता कदम यांनी सुध्दा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हा आपला एक परिवार असून सर्व भेद तथा गैरसमज दुर करून त्याला मजबूत करावे.तरच त्यातील सभासदांना न्याय मिळून त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून केले.लोकस्वातंत्र्य पदाधिकारी विनोद बंडले यांच्या राजकीय सुरवंट या वृत्तपत्राचे विमोचन यावेळी करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना यावेळी सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराज्य राज्य संघटन तथा संपर्क प्रमुख अरविंदराव देशमुख,महाराष्ट्र २४ न्यूज चॅनेल संपादिका अमिता कदम,विदर्भ संघटक,पंजाबराव देशमुख,ठाणे जिल्हा संघटन तथा संपर्क प्रमुख संजय सोळंके,सुषमा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.या मेळाव्यात अनेक सभासदांनी आपले सभादत्व फॉर्म भरून संघटनप्रती आपला विश्वास व्यक्त केला.संजय देशमुख यांनी पत्रकार आणि सामाजिक कल्याणासाठी शासन संपर्क आणि विविध उपक्रमातून होणाऱ्या वाटचालीची, वृत्तपत्रांच्या जाहिराती तथा कल्याण योजनांसाठी. चालू असलेल्या मागण्यांची माहिती दिली.यावेळी अध्यक्ष आणि उपस्थितांसह सर्व सभासदांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यांनीसंघटनकार्यासाठीकटीबध्द असल्याचे अभिवचन यावेळी दिले.सभेचे आयोजक श्री संजय सोळंके यांची ठाणे जिल्हा संघटन तथासंपर्क प्रमुख मृहणून नियुक्तीची घोषणा अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावेळी केली.