ऑल इंडिया संपादक संघ बारामती नूतन कार्यकारणी घोषित
अध्यक्षपदी फिरोज भाई शेख तर सचिव पदी संतोष पांढरे
बारामती दि.२२: ऑल इंडिया संपादक संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांचे सूचनेनुसार बारामती तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. जुनी कार्यकारिणी बरखास्त करून जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थितीत नवीन पत्रकारांना संधी देऊन सभासदत्व बहाल करून कार्यकारणीचे सर्वानुमते घोषणा करण्यात आली.
या यादरम्यान पत्रकार संघाचा नवनिर्वाचित कार्यकारणीचा अध्यक्षपदी फिरोजभाई शेख, उपाध्यक्षपदी राजू कांबळे, सचिव पदी संतोष पांढरे,कार्याध्यक्षपदी निलेश जाधव, सहसचिव प्रमोद कर्चे, संघटक पदी सनी पटेल, कोषाध्यक्ष पदी महेंद्र गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ऑल इंडिया संपादक संघाचे प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भारत तुपे, महासचिव भीमसेन उबाळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सन्मान पर अभिनंदन केले. ऑल इंडिया संपादक संघ पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून जनहितार्थ उपक्रम राबवून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष फिरोज भाई शेख यांनी सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत तुपे, महासचिव भीमसेन उबाळे, पुणे शहराध्यक्ष प्रतीक चव्हाण, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय थोरात, जिल्हा कार्यकारणी सदस्य दशरथ मांढरे, सुनील शिंदे, उमेश दुबे, संतोष सवाणे,आकाश दडस संपादक संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीच्या अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.