बारामती बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू

0
12
    बारामती बाजार समितीमध्ये  शेतमाल तारण कर्ज योजना सुरू 
     शेतक-यांचा शेतमाल काढणी हंगाम चालु झाल्या बरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येऊ शकतात. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावाधी नंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतक-यांना जादा दर मिळु शकतो. सरद बाब विचारात घेऊन शेतक-यांना रास्त बाजारभाव मिळावा या दृष्टीकोनातुन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने पणन मंडळाने केलेल्या सुचना विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणे सन २०२४-२०२५ या हंगामा करिता शेतमाल तारण  कर्ज योजना सुरू केली आहे.  या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतक-यांनी फायदा घ्यावा असे आवाहन सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.  

शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजरी, गहु, ज्वारी, उडीद, सोयाबीन इत्यादी शेतीमाल स्विकारला जाईल. यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्ती लागु राहतील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यास ठेवलेल्या शेतीमालावर हमीभावा प्रमाणे किंवा चालु बाजारभावानुसार किंमतीचे ५० ते ७५ टक्के कर्ज दिले जाईल. सदर तारण कर्ज बाजार समिती मार्फत द.सा.द.शे. ३% व्याजाने धनादेशा द्वारे सहा महिने मुदती करिता दिले जाईल. यासाठी शेतक-यांनी ७/१२ उतारा त्यावर चालु हंगामातील पिक नोंद, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे कार्यालयात जमा करावयाची आहेत. शेतमाल तारण ठेवणे पुर्वी शेतक-यांनी आपला माल यांत्रिक चाळणीवर स्वच्छ केलेला असावा. तसेच सदरचा शेतमाल वाळलेला व गोणपाटाच्या बागदान्यात स्विकारला जाईल. ओलावा असलेला शेतमाल स्विकारला जाणार नाही. सदर योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी बारामती बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here