बहिण भावाचा सण
किती आनंद झाला बाई
आला उंब-यात मुराळी
ताई आलो गं मी
ठोकली दादानं आरोळी
आईबापाच्या पाठीमागं
माहेर जीतं ठेविलं
राखी भाऊबीजेचा सण
हिरवं सपान दाविलं
गेले माहेरी अंगणात
चिमण्या चिवचिवल्या झाडाच्या
बहिणीबाळी सख्यांना बघून
पारंब्या हसल्या वडाच्या
पूनव राखीचा सण
साक्ष बहिण भावाच्या प्रेमाची
दिली दादानं ओवाळणी
त्याच्या कष्टाच्या घामाची
चार दिस अजून -हाय
किती दिसानं आली
खरं सांगते बायांनो
आई दादाच्या डोळ्यात दिसली
येईल रं पुना कधी मंदी
तुझा सुखाचा संसार बघायला
झाडावरच्या चिमण्या लागल्या
आसवाचा सागर लोटायला
©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३