सर्व महापुरुष संयुक्त जयंती 2024 पुरस्कार वितरण संपन्न
तसेच१०४ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश स्कूल बॅग,शालेय साहित्य वाटप
बारामती-
सर्व महापुरुष संयुक्त जयंती 2024 जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना वीर फकीरा योद्धा पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज गौरव, पुरस्कार संविधान सन्मान जागृती पुरस्कार, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे उत्कृष्ट संस्था पुरस्कार विविध क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच यावेळी बारामती शहर तालुक्यातील १०४ गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, वही, पेन, पुस्तके इत्यादी वाटप करण्यात आले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम जोशी, प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत, रिपाइ जिल्हा संपर्कप्रमुख विक्रम शेलार , महाराष्ट्र आयकॉन डॉ. अमर चौरे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार वितरण करण्यात आले.
सर्व महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव हा उपक्रम समाजातील जाती-जातीत निर्माण होणारा तेड कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच समाज एक संघ ठेवेल असे प्रतिपादन माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशवराव बापू जगताप यांनी केले तर समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवीत त्यांच्या कार्याचा सन्मान राखणे तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवौउदगार पश्चिम महाराष्ट्र रिपाई अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले, यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. सुनील शिंदे, संपादक उमेश दुबे, दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ, रिपाई तालुका अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील शिंदे, सूत्रसंचालन निलेश जाधव, मयूर मोरे यांनी तर आभार उमेश दुबे यांनी मानले.
यावेळी सुखदेव हिवरकर, पत्रकार तैनूर शेख, संतोष शिंदे, प्रा. रमेश मोरे,प्रा.बी.जी. घेरे,रिपाइं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे,पुनम घाडगे, नरेश डाळिंबे, नागेश साळवे, दिगंबर कदम गुरुजी, नजीर बाबा मुलानी, रवींद्र सोनवणे, अभिजीत कांबळे, दत्तात्रेय लोंढे प्रमोद खंडाळे, अनिल लांडगे, विशाल खंडाळे, आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.