भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तहसील कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे यांच्यासह उप विभागीय व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.