बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार येथे चिंच लिलावाचा शुभारंभ

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार येथे चिंच लिलावाचा शुभारंभ

0
109

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार येथे चिंच लिलावाचा शुभारंभ

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार येथे आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ पासुन चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांचे हस्ते झाला. सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनुस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतक-याच्या  चिंचेस प्रति क्विंटल रू. ५३००/- असा उच्चांकी दर मिळाला. अलिबाग येथील खरेदीदार बाळासो चोरगे यांनी सदर चिंच घेतली. तसेच  लिलावात अखंड चिंचेस प्रति क्विंटल दर किमान रू. २१००/- तर सरासरी दर रू. ३३००/- निघाले. फोडलेल्या चिंचेस प्रति क्विंटल कमाल दर  रू. १२०००/- तर सरासरी दर प्रति क्विंटल रू. १०,०००/- मिळाला. तसेच चिंचोकास प्रति क्विंटल रू. २१२१ ते २३००/- दर मिळाला. शेतक-यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवुन व चांगल्या पॅकींग मध्ये आणावी असे आहवान चिंच उत्पादक शेतक-यांना बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने  करणेत येत आहे.    
सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी प्रसिद्ध अशी जुनी बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापुर, भोर इत्यादी तालुक्यातुन तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातुन शेतकरी चिंच विक्री साठी दरवर्षी येत असतात. सदर चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता सुरू होतील. त्यामुळे शेतक-यांनी आपली चिंच लिलावापुर्वी  विक्रीस आणावी. चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापुर, लातुर, औरंगाबाद, अलिबाग तसेच हैद्राबाद या भागातुन खरेदीदार येत असतात. शेतमालाचा लिलाव हा उघड लिलाव पद्धती तसेच शेतमालाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर लिलावा पुर्वी होत असल्याने स्पर्धा होऊन चिंचेस चढा दर मिळत आहेत. गतवषी पेक्षा या वर्षी चिंचेस जादा दर मिळत आहेत तसेच आणखी दर वाढतील अशी माहिती सचिव श्री. अरविंद जगताप यांनी दिली.  यावेळी बारामती बाजार समितीचे सदस्य सतिश जगताप, अरूण सकट व  सुपे व्यापारी अध्यक्ष सुभाष चांदगुडे तसेच व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here