विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान ही एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बारामती पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या पोलीस ऑफिसर अमृता भोईटे व कराटे प्रशिक्षक श्री. साहेबराव ओहळ हे लाभले होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी कु. मुस्कान पठाण आणि चि. रितेश साखरे यांनी केला. मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले. या अभियाना अंतर्गत महिलांचा सामाजिक व कौटुंबिक सुसंवाद, विद्यार्थिनी, पालक- शिक्षक परस्पर संवाद, महिलांची परिस्थितीजन्य निर्णय क्षमता तसेच स्त्रीचे हक्क, अधिकार विषयक नियम याविषयी सखोल माहिती देऊन कुठल्याही प्रकारची हिंसा अनुचित शेरेबाजी, अनुचित मागणी, अनुचित विनंती तसेच कोणतेही प्रकारची शारीरिक, शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाची अस्विकारार्ह वागणुक या महत्त्वपूर्ण बाबींवर या कार्यशाळेमध्ये अत्यंत सखोलपणे मार्गदर्शन करण्यात आले. आपण समाजात वावरत असताना जर आपल्यासमोर एखादा अपघात अगर एखादी वाईट घटना घडली तर आपण त्याच्याकडे डोळे झाक न करता आपण तिथं मदत केली पाहिजे तसेच ११२ या नंबरला फोन लावून या घटनेची आपण तात्काळ माहिती दिली पाहिजे. तसेच १०८ या नंबरशी संपर्क साधून ॲम्बुलन्सची मदत घेतली पाहिजे. आपल्या या जागृतपणामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. तसेच मुलींनी आई-वडिलांशी कोणत्याही विषयावर अत्यंत मनमोकळेपणे बोलले पाहिजे. स्वतःच्या आई वडील आपले चांगले मार्गदर्शक, हितचिंतक असतात, म्हणून आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्यान उगवेल परंतु एकदा माती आड झालेले आई वडील हे आपल्याला आयुष्यात पुन्हा कधीही दिसणार नाहीत याची सर्वांनी जाणीव ठेवावी अशा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक साहेबराव ओहळ यांनी दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विभाग प्रमूख डॉ. अपर्णा सज्जन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. हनुमंत बोराटे यांनी काम पहिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक सोनवणे, तसेच प्रा. गौरी भोईटे यांनी विशेष कष्ट घेतले.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा यशस्वी संपन्न