बारामतीतील नव्या बसस्थानकासह विविध प्रशासकीय इमारत बांधका माची उद्घाटणे ,लोकार्पण सोहळा लवकरच….! ?

बारामतीतील नव्या बसस्थानकासह विविध प्रशासकीय इमारत बांधका माची उद्घाटणे ,लोकार्पण सोहळा लवकरच....! ?

0
114

प्रतिनिधी :- लवकरच …बारामतीतील प्रशासकीय विविध इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पडणार…!


बारामतीच्या नवीन बसस्थानकाचे उदघाटन पुढील महिन्यात होणार…!

बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व पोलिस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वास्तूंचे उदघाटन घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले…

बारामती येत्या महिन्यात बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व पोलिस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वास्तूंचे उदघाटन घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीत जवळपास ५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक व सुसज्ज बसस्थानक अजित पवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आले आहे. एखादया विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक असून या मुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पुणे पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस उपमुख्यालय वसविण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक इमारती, प्रशिक्षण केंद्र, परेड ग्राऊंड व निवासस्थाने उभारण्यात आली आहेत.


बारामती शहर, तालुका व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचा-यांसाठी तब्बल 196 निवासस्थाने असलेल्या ७ अत्याधुनिक इमारती पोलिस लाईन परिसरात उभारण्यात आल्या आहे

तिन्ही इमारती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याचा अजित पवार यांचा मानस असल्याचे समजते .शहराच्या विकासात्मक पाहणी दौ-याच्या वेळेस अजित पवार यांनी हे सूतोवाच केलेले असून प्रशासन त्या विचारातून तयारीला लागले आहे…! काय तर लोकसभेच्या निवडणूकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे उदघाटन घ्यायचे असल्याने या आठवड्यात याच्या तारखी निश्चित होतील असं समजते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here