आमच्या बारामती शहराला कोणाची नजर ना लागो….!

0
108

आमच्या बारामती शहराला कोणाची नजर ना लागो….!

: संपादक संतोष शिंदे बारामती :

आमचे बारामतीचे एक असं शहर जिथे दररोज नाविन्यपूर्ण येथे प्रत्येकात आहे एक विविधतेचा ध्यास….!?

रेल्वे पासून ते विमानापर्यंत सर्व रस्ते दळणवळणाची काळजी घेणारे बारामतीचे विविधतेने नटलेले सर्वगुण संपन्न शहर… सर्व जाती धर्मांना सामावून घेणारे व गुण्यागोविंदाने आनंदाने थाटलेली, कविवर्य मोरोपंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.. भीमथडी ते आत्ताचे बारामती गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय ओळख तर ऐतिहासिक साक्ष देणारे , बारामतीचे शहर.. होय…!
पर्यावरणाच्या धोरणापासून येणाऱ्या काळाचा ध्यास वैज्ञानिक दृष्टिकोन.. शेतकीय धोरण येथे सर्व काही धोरणत्मक प्रीचीती असलेली ओळख… !

यार मला काही वेगळे करायचे…बारामतीत… माझी स्वप्न मोठी…माझे विचार मोठे… तर… माझे आपले बारामतीत आहे… ते वेगळेपणा… जे इतरांना माझ्या हेवा वाटावा… प्रत्येकाने म्हणावं नुसताच… वा.. वा..व्हा.. नको करायचा नाही.. तो बारामतीचा बारामतीकरांचा काय असेच वेगळे करायचे काहीतरी थातूरमातूर करून आपले हसू नको सतत ध्यास असतो… येथील नागरिकास तर नेतेमंडळी ही येथे नाविन्याचा प्रयोग करत असतात..!

रोज नव्नवीन , नावीन्याय चीचं..येथे असतो ध्यास
..विचार उमंग, स्वप्न नवी उमेद नवी येथील शाळा, कॉलेज ,महाविद्यालय, यामधे विविध क्रीडा विभाग, तर येथील मॉर्निंग ग्रुप ,तर स्वच्छ ,सुंदर, हरित आणि सर्वात महत्त्वाचे वेगळेपणाची आठवण आपुलकी.. म्हणजे उत्तम अगदीच..
चहापासुन ते खान, पान, रुचकरता..येथे आहेत जिम व्यायाम शाळा, कुस्तीगीर lसंघ, सायकल ची आवड,धावणे सर्व सर्व काही नियोजन स्पर्धात्मक उत्तमा उत्तम आरोग्याच्या करिता लक्षपूर्वक येथील नागरिक ही स्वतःकडे लक्ष देत असतात .
येथील दुकानदार व्यापाऱ्यांची पारदर्शकता, कलयुगातील स्पर्धा, जो तो बारामतीच्या शहराला आपापल्या माध्यमातुन वेगळेपणा देण्याचा रोजच्या रोज नित्यनेमाने प्रयत्न करत असतो. तो मग कोणीही असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही क्षेत्राचा असो काय माझ्याकडे नाविन्य आहे व बारामतीकरांच्या सर्वोत्तम साठी आहे.

तशाच्या प्रकारे सादरीकरण देखील करतात सर्व सुविधायुक्त अशी आमच्या बारामतीची ओळख निर्मिती झालेली आहे .

येथे उद्योग- व्यापार नवनवीन कंपनी , कंपनीत कापड उद्योग , कंपनी ते ग्राहक थेट संबंध… अत्याधुनिक कंपनीज मध्ये उदाहरणार्थ भारत फोर्स , पियाजो, डायनॅमिक्स, फेरेरो, वेस्पा आदी सह वैमानिक संस्था… महाराष्ट्रातील अत्याधुनिक बारामतीचे नवीन बस स्थानक, पंचायत समिती, नवीन प्रशासकीय इमारती, आरटीओ इमारती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, ॲग्री कॉलेज, महिलांसाठी महिला हॉस्पिटल निर्माण केलेले गेले आहे.

तर आता व बारामतीतून वाहणारी क-हा नदीपात्र या नदीपात्राची विकास कामे होत आहेत.

विविध पुरातन मंदिरे वाडे रस्ते विविध रस्त्यामध्ये वीज अंडरग्राउंड, पाणी , बारामतीतील विविध रस्त्यातील ड्रेनेजस् अंडरग्राउंड तर स्टेट लाईट केबल अंडरग्राउंड केलेली पाहायला मिळते.

बारामती ते भिगवन रस्ता कॉंक्रिटीकरण होत आहे.

या बारामतीच्या शहरात विविध शाळा कॉलेज महाविद्यालयाच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनियर ,वकील, वैमानिक, वैज्ञानिक, इलेक्ट्रिशन, पत्रकार, संपादक, पायलट ,नर्सेस तर कृषी क्षेत्रातील पदवीधर

त्याचप्रमाणे बारामती मोठमोठी मॉल्स ,दुकाने अद्यावत असे पार्किंग व्यवस्था विविध शासकीय प्रशासकीय कार्यालय पेट्रोल पंप नवीन टोलेजंग इमारती उभारण्याचा चंग तर सर्व सुख सुविधायुक्त तर उत्तम आरोग्यास योग्य ते आरोग्य दायी गार्डन ग्राउंड,l सुविधायुक्त विविध देशपातळीवरील स्पर्धांचे आयोजन, राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन, नाट्य कला मनोरंजन, सुसंस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, व्याख्यानमाला, कुस्ती स्पर्धा, सायकलिंग स्पर्धा , आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेटचे सामने राज्यस्तरीय, विज्ञान प्रदर्शन ,कृषी प्रदर्शन, उत्तम लग्न समारंभ साठी विविध सुशोभित असे मंगल कार्यालय, तर महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम उत्तम असे शेतकऱ्यांच्या फायद्याचे व शेतकऱ्यांच्या विचाराचे व शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारले गेलेले कृषी व्यवसाय साठीचे अद्यावत कृषी उत्पन्न बाजार समिती,समितीची कार्यालय ,बारामतीतील नटराज चे कलादालन,विविध नाट्यगृह सिनेमा थिएटर्स, लहान मुलांच्या करिता उत्तम आरोग्यदायी मोदामृत पोषण आहार… काय नाही बारामतीत भीमथडी जत्रा, भोंडला, महिलांसाठींचे लावणी कार्यक्रम, होम मिनिस्टर ,हळदी कुंकवाचे महोत्सव, मोठ्या प्रमाणात बचत गटाचे उद्योग, त्यातूनच मग व्यवसायाचे जत्रांच्या आयोजन ,विविध वस्तूंची कलाकुसर निर्मिती, खाऊ गल्ली ,सर्वगुणसंपन्न बारामती काय नाही याचा विचार न केलेला बरे म्हणूनच म्हणतो बारामतीला कोणाची नजर न लागो…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here