संयमी आणि शालीन नेतृत्व-मा. सुनेत्रावहिनी… …

0
322

संयमी आणि शालीन नेतृत्व-मा. सुनेत्रावहिनी

आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांचा आज वाढदिवस.वहिनी आदरणीय अजितदादांच्या सहचारिणी एवढ्यापुरत्या मर्यादित नसून त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अजितदादांचा कामाचा उरक आणि झपाटा पाहून वहिनींनी आपल्या काटेवाडी या गावातून स्वच्छता ,पाणी,पर्यावरण रक्षण यासारख्या विषयावर कामाला सुरूवात केली. नंतरच्या काळात फोरमच्या माध्यमातून कामाचा डोंगरच उभा केला आहे.अनेक तरुण सहका-यांना बरोबर घेऊन बारामती परिसरात ओढा खोलीकरण,वनीकरणातील प्राण्यांसाठी पाणवठे ,बारामतीत रस्ते ,सार्वजनिक ठिकाणे वृक्षारोपन ,कापडी पिशवी वापर असे अनेक उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करत आहेत.

आदरणीय वहिनींनी आपल्या नावाप्रमाणेच मोफत मोतीबिंदू शिबीराचे आयोजन करुन हजारो गरजू व्यक्तींना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य केले आहे.ज्या वृद्धांवर शिबिराच्या माध्यमातून शस्रक्रिया झाल्या ते आज वृद्धापकाळात आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आदरणीय वहिनी मनोमन सुखावतात.आणि पुन्हा नवी ऊर्जा घेऊन कामाला लागतात.

सुनेत्रावहिनी उत्तम संघटक असून महाराष्ट्रातील अनेक महिलांना त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले आहे. बारामतीत फोरमद्वारे आपल्या सहका-यांच्या मदतीने त्यांनी वसुंधरा वाचवा ही मोहिम हाती घेतली असून त्यासाठी वहिनी अतिशय नियोजनपूर्वक काम करत आहेत. हाती घेतलेले काम किंवा उपक्रम याचे चोख व काटेकोर नियोजन करुन यशस्वी करतात.बारामती परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर फोरमच्या माध्यमातून कौतुकाची थाप देतात.

जनसामान्यात सहज मिसळून प्रत्येकाशी स्मितहास्य करुन संवाद साधने ,त्यांची समस्या समजून घेणे आणि त्यांना सहकार्य करणे ही सुनेत्रावहिनी यांची खासियत आहे.

आपणांस आज बारामती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे त्यात दादांइतकाच वहिनींचा सिंहाचा वाटा आहे.दादा आणि वहिनी दोघेही वृक्षप्रेमी असल्याने बारामती वृक्षांनी सजलेली दिसून येते.रस्त्याच्या दुर्तफा हिरवेगार बहरलेले डेरेदार वृक्ष पाहून बारामतीचे सौंदर्य डोळ्यात साठविण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही.
महिलांनी चूल आणि मूल याच्या बाहेर येऊन स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी झाले पाहिजे यासाठी टेक्सटाईल पार्कमध्ये खेडोपाड्यातील अनेक महिलांच्या हाताला काम दिले आहे.आज टेक्सटाईल पार्कमुळे अनेकांचे संसार उभे राहिले आहेत.महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी सुनेत्रावहिनी नेहमीच क्रियाशील व कार्यतत्पर असतात.

विद्या प्रतिष्ठान ,कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था अशा विविध संस्थावर वहिनी विश्वस्त म्हणून अतिशय उत्तम काम करीत आहे.आदरणीय वहिनीसाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता याबाबत वहिनी आग्रही असतात.त्यासाठी वेळोवेळी विविध विभागांना त्या मार्गदर्शन करतात.

कोणतेही काम करताना सहका-यांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात.त्यामुळे आज वहिनींच्या भोवती कार्यकर्ते यांचे जाळे निर्माण झाले आहे.अडचणीच्या काळात आपल्या सहका-यांची आपुलकीने चौकशी करुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.म्हणून सगळ्यांना वहिनी आपल्या आधारस्तंभ वाटतात.
संयमी आणि शांत स्वभावाने सर्वाना आपलेसे करणाऱ्या सुनेत्रावहिनींना समाजासाठी काम करण्यास निरोगी व आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

✒️ लक्ष्मण जगताप सर
बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here