अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या अभ्यासवर्गाचे बारामतीत उद्घाटन संपन्न

0
121

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या अभ्यासवर्गाचे बारामतीत उद्घाटन संपन्न

कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले

बारामती, १५ जुलै २०२३ :

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा ४ दिवसीय प्रदेश अभ्यासवर्ग बारामती शहरात दि. १५ जुलै ते १८ जुलै या दरम्यान होत आहे. आज १५ जुलै ला सायंकाळी ७ वाजता या अभ्यासवर्गाचे उद्घाटन अभाविप राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते,प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे,प्रदेश संघटन मंत्री श्री. अभिजीत पाटील व अभ्यासवर्ग प्रमुख प्रा. प्रदीप वाघ यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अभ्यास वर्गाच्या पूर्व कालावधीत म्हणजेच दि. १४ व १५ जुलै ला पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली.

या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील २ प्रस्ताव उपस्थित प्रतिनिधींशी चर्चा करून सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने पारित करण्यात आले.

या प्रस्तावातील मुद्द्यांना घेऊन अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशातील कार्यकर्ते पुढील काळात कार्य करेल.

अभ्यास वर्गाच्या पहिल्या दिवशी (दि.१५ जुलै) सायंकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी स्व. प्रा.वसंत दत्तात्रेय मावळणकर प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन

अभाविप पूर्व कार्यकर्ते अविनाश मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तात्यासाहेब घावटे, प्रदेश सहमंत्री आनंद भुसनार यांच्या हस्ते झाले.

यावेळी, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या संघटनात्मक दृष्टीने २३ जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या “भारत माता की जय, स्वामी जी का त्या संदेश-सुंदर सुहाना भारत देश, गाव गाव में जाएंगे – भारत भव्य बनाएंगे” अशा उत्स्फूर्त घोषणाबाजी ने सर्व वातावरण दुमदुमले.

यानंतर अभ्यासवर्गाचे उद्घाटन ७ वाजता अभाविप राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते,प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे,प्रदेश संघटन मंत्री श्री. अभिजीत पाटील व अभ्यासवर्ग प्रमुख प्रा. प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते यांनी अभ्यासवर्गाचे प्रास्ताविक मांडले. व्यक्ती निर्माणाच्या दृष्टीने अभ्यासवर्ग कशाप्रकारे महत्त्वाचा ठरतो.

तसेच कार्यकर्ता प्रशिक्षणा करिता घेण्यात येणाऱ्या सत्रांची माहिती देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

अभ्यासवर्ग प्रमुख प्रा. प्रदीप वाघ यांनी अभ्यासवर्गात होणारे सत्र, त्यांचे विषय व त्यासाठी येणाऱ्या प्रमुख उपस्थितीतींचा परिचय व इतर विशेष बाबींची माहिती यावेळी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क
प्रगती कराड ९३५९१६५१४३
(प्रदेश मीडिया संयोजक, अभाविप प. म.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here