बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर…

0
166

बारामती, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी १० रोजी ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

येथील बाजार समितीत माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हनुमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे. शेतमाल विक्रीस आणण्याचे बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने शेतकऱ्यास आव्हान करण्यात येत आहे.

चांगल्या दर्जाच्या गव्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळाला. मक्याला २७७१ रुपये प्रति क्विंटर, बाजरी, हरभरा, तूर उडीद, या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल २५०१, हरभरा ४७८१, तूर ९०११, उडीद ८१४० व खपलसाठी २५२० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला.

खरेदीदार म्हणून आवारातील बाळासाहेब फराटे, महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदीश गुगळे, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे यांनी सहभाग घेतला. बाजार आवारात शेतमालास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दिली.
आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली आहे.

अरविंद जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव ( ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यातून आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यातून शेतमालाची आवक होते. मुख्य बाजार आवारात ग्रेडिंग मशिन असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. यासाठी आणखी एक नवीन मशिन बसविण्याचा समितीचा मानस आहे. शेतकऱ्याचा शेतमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल. त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच समितीने आवारात शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा असल्याने लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप व्यक्त केले.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here